मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत.
अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील या ग्लॅमर्स फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, 49 वर्षांची ही अभिनेत्री अजूनही 24 वर्षांच्या मुलींपेक्षा सुंदर दिसते. म्हणूच सोशल मीडियावर अभिनेत्रीचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या मालयकाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री मुंबईतील एका पॉश भागातील सलूनबाहेर असल्याचं दिसत आहे. यावेळी मालयकाने एक ब्लॅक आणि ग्रे चेक्स असलेलं हुडी (जॅकेट) परिधान केल्याचं दिसून येत आहे.
मलायका अरोराने 3 लाख 47 हजार रुपये किमतीचा डायर ब्रँडचा हुडी घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा महागडा ड्रेस परिधान करून ती मुंबईतील वांद्रे भागातील एका सलूनमध्ये जाताना दिसली. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी मलायकाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मलायकाच्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
मलायकाचा हा व्हिडिओ काही वेळातच इंटरनेटवर चर्चेत आला होता. मलायकाच्या ड्रेसची किंमत 3 लाखांहून अधिक आहे, हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एवढा महागडा ड्रेस घालून सलूनमध्ये कसा जाऊ शकतो, असे अनेक प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. सध्या तिच्या हुडीची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगू लागली आहे.