‘बिग बॉस’मध्ये इंटरेस्ट नाही

गेल्या दशकभरात “बिग बॉस’ आणि “कौन बनेगा करोडपती’ या रिऍलिटी आणि गेम शो ला अनेक भाषांमधून सुरुवात झाली आहे. भारतातच बहुतेक प्रत्येक प्रादेशिक भाषेमध्ये “बीबी’ आणि “केबीसी’ला सुरुवात झाली आहे. “बिग बॉस’ या रिऍलिटी शो मध्ये सहभागी होण्यासाठी अनेक सेलिब्रिटीजमध्ये चढाओढ असते. सिनेमा आणि सिरीयलमधून मागे पडलेले अनेक कलाकार या व्यासपिठाचा आपल्या करिअरसाठी चांगला उपयोग करून घेण्याच्या प्रयत्नात असतात. 3 महिन्यांच्या शेड्युलमध्ये दररोज प्रेक्षकांसमोर येण्याची संधी असते. शिवाय गॉसिपमधून मिळणारी प्रसिद्धीही असतेच. तमिळमध्येही “बिग बॉस’चा तिसरा सीझन सुरू होण्याची हालचाल सुरू झाली आहे.

सोबिता धुलिपाला तमिळ “बिग बॉस 3’मध्ये सहभागी होणार अशी उगाचच अफवा पसरली होती. तिच्या सहभागामुळे हा शो हिट होईल, असा अंदाज होता. नागार्जुन सादर करणाऱ्या “बीबी-3’साठी आतापासून फिल्डींग लावणाऱ्य सेलिब्रिटीजना हा मोठा धक्का आहे. सोबिता काही निवडक सिनेमांमधून दिसली होती. मात्र नेटफ्लिक्‍सवरच्या “मेड इन हेवन’ या वेबसिरीजमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली. ती जरी तेलगू बोलणारी ऍक्‍ट्रेस असली तरी ती मुंबईतच रहाते आणि नागार्जुनची मुलगी सुप्रियाची चांगली मैत्रिणही आहे. तिने “बिग बॉस’चा प्रस्ताव सरळ धुडकावून लावला आणि आपल्याला याबाबत काहीही विचारू नका, असेही स्पष्ट करून टाकले. शोच्या पब्लिसिटीसाठीही आपले नाव वापरले जाऊ नये, असेही तिने निर्मात्यांना कळवून टाकले आहे. आता जर तिने नकार दिला तर तिच्या जागेवर अन्य कोणी तरी “बिग बॉस 3’मध्ये येईल. पण अखेर सोबिताने यासाठी नकार का दिला, हा प्रश्‍न रहतोच.

Leave A Reply

Your email address will not be published.