सलमान उघडणार 300 जीम

सलमान आणि त्याचा फिटनेस हे समिकरण काही नव्याने सांगण्याची आवश्‍यकता नाही. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या सलमनच फिटनेस नवख्या हिरोना लाजवेल असा आहे. करिअरला 20 व्रषे झाली तरी अजूनही तो यंग ऍक्‍शन हिरोच्या रोममध्ये फिट बसतो आहे. त्याने एका जीम कंपनीच्या फ्रॅंचायजीबरोबर टायअप केले आहे आणि देशभरात 300 जीम उघडण्याचे ठरवले आहे.

यापूर्वी सलमानने फिटनेस इन्स्ट्रूमेंटशी संबंधित दोन कंपन्यां सुरू केल्या होत्या. आता त्याने जीम इंडस्ट्रीमध्ये काम करायचे ठरवले आहे. “एसके-27′ असे त्याच्या जीम चेनचे नाव असणार आहे. प्रत्येकाला फिट आणि हेल्दी राहण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा यामागील उद्देश असल्याचे सलमानने म्हटले आहे. याशिवय या “एसके-27′ जीममधून जीम इन्स्ट्रक्‍टरदेखील तयार केले जाणार आहेत. एप्रिल महिन्यात सलमानने फिटनेस साहित्याचा ब्रॅन्ड विकसित केला होता. सलमानची ही फिटनेस इन्स्ट्रुमेंट देशभरात 175 जीममध्ये बसवली गेली आहेत.

वर्क फ्रंटच्या बाबतीत बोलायचे तर सलमानकडे सध्या 2 प्रोजेक्‍ट आहेत. त्यातील पहिला आहे तो “दबंग 3′ त्याचे शुटिंग जवळपास पूर्ण झाले आहे आणि येत्या डिसेंबरमध्ये तो रिलीजदेखील होणार आहे. तर दुसरा आहे अलिया भट बरोबरचा “ईन्शाअल्ला’. संजय लिला भन्साळीच्या डायरेक्‍शनखाली तयार होणाऱ्या या सिनेमात सलमान एका अनिवासी भारतीय उद्योजकाच्या रोलमध्ये असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.