काऱ्हाटी -वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातंर्गत सुपे, काऱ्हाटी, काळखैरेवाडी, माळवाडी, कोळोली परिसरातील बारा वाड्या परिसरात अवैध व्यवसायाने बाळसे धरले आहे. यापूर्वी वडगाव निंबाळकर पोलिसांनी काही प्रमाणात कारवाई केली होती. कारवाईनंतर काही दिवस अवैद्य धंदे काही अंशी कमी झाले होते.
मात्र, पुन्हा अवैध धंदेवाल्यांनी डोके वर काढले आहे. परिसरात सर्रास गुटखा विक्री होत आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्याने पुन्हा गुटखा माफिया सक्रिय झाले आहेत. तालुक्यातील अवैध धंद्यांना चाप लावण्याची मागणी होत आहे.