हडपसर(विवेकानंद काटमोरे,प्रतिनिधी) : यंदाच्या वर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक विसर्जन स्थळांवर म्हणजे हडपसर मधून वाहणारा नवीन कालवा तसेच मुळा-मुठा नदी पात्र येथे नागरिकांना थेट गणेश विसर्जन करता येणार नाही . तर महापालिकेच्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुमारे ३६ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था महापालिकेकडून केली आहे.
नवीन कालवा आणि मांजरी बुद्रुक येथील मुळा- मुठा नदी ही या परिसरातील नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत .गेली अनेक वर्षे येथे नागरिक गणेश विसर्जन करत होते. मात्र ,यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी गणेश विसर्जनासाठी जाता येणार नाही. येथे असलेल्या विसर्जन घाटांवर बांबू तसेच बॅयरेकट्स बाधण्यात आले आहेत.त्यामुळे नागरिकांना त्यांच्या जवळ असलेल्या महापालिकेच्या मूर्तीसंकलन केंद्रात गणेशमूर्ती द्यावी लागणार आहे. प्रत्येक प्रभागात किमान ७-८ मूर्ती संकलन केंद्रे सुरु केली आहेत.
प्रभाग क्रमांक २२,२३,२६ ,४२ आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावात ३६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र व निर्माल्य जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय हडपसर – मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे १७ फिरते हौद तयार असून प्रत्येक आरोग्य कोठीकडून तो फिरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी ३०० स्वच्छता कर्मचारी व २५६ मदतनीस यांची गणेश विसर्जन व्यवस्थेसाठी नेमणूक करण्यात आली आहे.
“विसर्जनापूर्वीची पूजा, आरती आणि इतर विधी घरीच पूर्ण करावी. ज्यामुळे मूर्ती संकलन स्थळी गर्दी टाळता येईल.याशिवाय फिरते विसर्जन हौद आहेत तेथे मूर्ती विसर्जित करता येईल. संकलीत झालेल्या गणेश मूर्ती वाघोली येथील खाणीत विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही नैसर्गिक गणेश विसर्जन स्थळांवर न जाता मूर्ती संकलन केंद्रावर जावून मूर्ती द्याव्यात.
– प्रसाद काटकर(सहाय्यक आयुक्त ,हडपसर- मुंढवा)
नागरिकांना गणेश मूर्ती व निर्माल्य येथे देता येईल
प्रभाग क्रमांक -२२
मुंढवा भाजी मंडई, राजेश्री शाहू शाळा मुंढवा, मगरपट्टा सिटी कै. लक्ष्मीबाई मगर शाळा क्र.७७.बी, भोसले गार्डन हडपसर, पवार शाळा विठ्ठलनगर,आकाशवाणी आरोग्य कोठी पाण्याची टाकी,
न्यू इंग्लिश स्कूल डी पी रोड माळवाडी.
प्रभाग क्रमांक -२३
मनपा शाळा क्र.३२ हडपसर गाव,
महात्मा फुले क्रीडा संकुल
हिंगणे मळा, बंटर शाळा गाडीतळ हडपसर,
गोंधळेनगर भाजी मंडई समोर,
मारुतराव काळे शाळा काळेपडळ,
हनुमान बाल उद्यान तुकाई टेकडी.
प्रभाग क्रमांक -२६
सदाशिव नगर हंडेवाडी रोड, महमंदवाडी हडपसर, गावठाण शाळा लोणकर गार्डन कौसर बाग कोंढवा, दशक्रिया विधी घाट कोंढवा.
प्रभाग क्रमांक -४२
महादेव मंदिर लगत केशवनगर कुंभारवाडा ,जिल्हा परिषद शाळा साडेसतरानळी, बेंदवाडी पुलाजवळ फुरसुंगी, शिवशक्ती चौक- गंगानगर रिक्षा स्टँड मनपा संपर्क कार्यालय फुरसुंगी, गंगानगर महात्मा फुले वसाहत फुरसुंगी, संजूदा कॉम्प्लेक्स जवळ पापडे वस्ती,भेकराई नगर आरोग्य कोठी.
नवीन समाविष्ट गावे
ग्रामपंचायत कार्यालय हांडेवाडी,ग्रामपंचायत कार्यालय होळकरवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळेवाडी, ए. एम .कॉलेज महादेनगर, राम मंदिर मांजरी फार्म, पी.एम.आर.डी प्लॉट शेवाळेवाडी फाटा,ग्रामपंचायत कार्यालय मांजरी बुद्रुक,जिल्हा परिषद शाळा म्हसोबा वस्ती मांजरी बुद्रुक.