चेन्नई – आपल्या देशात प्राचीन भाषा संस्कृत समजली जाते, तसेच देवाची भाषा ही संस्कृत असल्याचे आपण समजतो, मात्र यावर मद्रास उच्च न्यायालयाने मत नोंदविले आहे. तामिळ ही देवाची भाषा असल्याचं सांगत देशभरातील मंदिरात देवपूजा संतांनी रचलेल्या तामिळ भजनांद्वारे करण्यास हरकत नसल्याचं मत मद्रास हायकोर्टाने नोंदवलं आहेे.
मुख्य म्हणजे लोक बोलत असलेली प्रत्येक भाषा ही देवाची भाषा असल्याचंही देखील न्यायालयाने सांगितलं. न्यायमूर्ती एन किरूबाकरण आणि न्यायमूर्ची बी पुगालेंधी यांच्या खंडपीठानं हे मत नोंदवलं आहे. याशिवाय देशभरातील मंदिरात देवपूजा संतांनी रचलेल्या तामिळ भजनांद्वारे करण्यास हरकत नसल्याचं सांगितलं आहे.
विविध देश आणि धर्मांमध्ये भिन्न श्रद्धा आहेत. संस्कृती आणि धर्मानुसार प्रार्थनास्थळं देखील भिन्न आहेत. स्थानिक भाषेचा उपयोग त्या ठिकाणी देवाशी संबंधित कामांसाठी केला जातो.
मात्र आपल्या देशात संस्कृत ही देवाची भाषा असल्याचा विश्वास आहे आणि इतर कोणतीही भाषा त्याच्या बरोबरीची नाही. संस्कृत ही प्राचीन भाषा असून त्यात अनेक साहित्य रचले गेले आहेत. तसेच संस्कृत वेदांचं पठण केल्यानंतर देव प्रार्थना ऐकतो, असा समज आहे.”, असं मत खंडपीठानं नोंदवलं आहे.
राज्याच्या कारूर जिल्ह्यातील एका मंदिरात तिरूमुराईकल, तामिळ मंत्र आणि संत अमरावती अतरांगरई करूरच्या पठणासह देवपूजा करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती याचिका करण्यात आली होती.
त्यावर न्यायालयाने सुनावणी करताना आपलं मत नोंदवलं आहे. “भाषा अनेक शतकांपासून अस्तित्वात आहेत. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत भाषेतून ज्ञान पोहोचलं आहे. त्यामुळे विद्यमान भाषेत सुधारणा होऊ शकते आणि भाषेची कोणतीही निर्मिती होऊ शकत नाही”, असं मत खंडपीठानं सांगितलं.