चेन्नई/ नवी दिल्ली – आयपीएल 2024 सुरू होण्याच्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्सने आपला कर्णधार बदलला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडकडे संघाची कमान आली आहे. धोनी 2008 पासून चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे. 2016 च्या मोसमात तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार होता. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई 5 आयपीएल ट्रॉफीसह दोन चॅम्पियन्स लीग विजेतेपद जिंकले आहेत. याशिवाय तो भारताचा टी-२० कर्णधारही राहिला आहे.
महेंद्रसिंग धोनी हा सर्वात जास्त टी-२० सामन्यांमध्ये कर्णधार असलेला खेळाडू आहे. त्याने 322 सामन्यांमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व केले आहे. यासह त्याने सर्वाधिक 189 विजयांची नोंद केली आहे. रोहित शर्माने 217 आणि वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमीने 208 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. धोनी हा कर्णधार देखील आहे ज्याने सर्वाधिक 9 फायनल जिंकल्या आहेत. भारताचा टी-20 कर्णधार म्हणून त्याने विश्वकरंडक 2007 आणि आशिया कप 2016 जिंकला आहे.
आयपीएलचे आत्तापर्यंत 16 हंगाम झाले आहेत परंतु बंदीमुळे चेन्नई सुपर किंग्जने दोन हंगामात भाग घेतला नव्हता. त्यामुळे धोनीने 14 वर्षात 212 आयपीएल सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले आहे. याशिवाय तो चॅम्पियन्स लीगच्या २३ सामन्यांत संघाचा कर्णधारही राहिला आहे.
चेन्नईने या 235 पैकी 142 सामने जिंकले आहेत. संघ केवळ 90 सामने हरला आणि दोन अनिर्णित राहिले. एक सामनाही बरोबरीत सुटला. चेन्नईचा कर्णधार म्हणून धोनीची विजयाची टक्केवारी 60.42 अशी होती. चेन्नईने या कालावधीत ७ विजेतेपद पटकावले आहेत.
विक्रमवीर माही…
महेंद्रसिंग धोनीने 14 आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले आहे. यामध्ये संघ 12 वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. केवळ 2020 आणि 2022 मध्ये चेन्नई संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. 2022 च्या पूर्वार्धात रवींद्र जडेजा चेन्नईचे नेतृत्व करत होता. यासह चेन्नई तब्बल 10 वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. अर्थात या सर्वांचे श्रेय जाते ते धोनीलाच! त्यामुळे, आजवर ना कधी धोनीसारख्या कर्णधार झाला ना कधी भविष्यात होईल!