अटलांटा बिच, फ्लोरीडा : कोणाचं काय तर कोणाचं काय! आता कोरोनाचंच घ्या! अख्खं जग या भयानक साथीनं हादरलंय! पण अमेरिकन पोलिस… त्यांनी या संकटाचीच इष्टापत्ती बनवलीय… अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी…
या प्राणघातक विषाणूची बाधा होऊ नये म्हणून जगभरातील सारे नागरिक धडपडत आहेत. एकमेकांना अलिंगन द्यायलाही बिचकत आहेत. मात्र या कोरोना व्हायरसच्या भीतीचा फायदा उठवत बेकायदा अमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी काही अधिकारी सरसावले आहेत. अटलांटिक बिच पोलिस फेसबुकच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी जनहितार्थ एक सूचना वितरीत करण्याची सूचना केली.
ती सूचना होती… सार्वजनिक सेवेसाठी घोषणा : इशारा : जर तुम्ही स्थानिकांकडून कोकेन, मेथ, हेरॉईन किंवा अन्य अमली पदार्थ घेतले असतील तर त्यात कोरोना विषाणू असण्याची शक्यता आहे…
येवढेच नाही तर, हे अमली पदार्थ आणून द्यावे. त्याची तपासणी मोफत करून देण्याची सोय केली आहे. जर तुम्हाला पोलिसांकडे येण्यात काही अडचण असेल तर कळवा. आमचा अधिकारी तुमच्या घरी येऊन रिकाम्या जागी त्याची तपासणी करून देईल.
पोलिस दलाच्या या विनोदाने नेटिझन्समध्ये विनोदाचे चांगललेच पेव फुटले आहे. एक नेटकरी म्हणतो… हा पोलिसांचा सापळा आहे हे कोणीही समजू शकेल. त्यामुळे ते पदार्थ माझ्याकडे द्या मी तुमच्यासाठी त्याची चाचणी घेईन. तर दुसरा म्हणतो… किती कॉल येतील याची संख्या ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. तर अन्य एक जण म्हणतो, मी माझे अमली पदार्थ फुकट देणार नाही. तुम्ही येथे याल तेंव्हा पैसे घेऊन या. पोलिस अधिकाऱ्यांसाठी हा पार्टी टाईम नाही….