Shark Tank Season 3 : महाराष्ट्रातील यवतमाळच्या लहान गावामधील २७ वर्षीय दूरदर्शी हर्षल महादेव नक्षाणेने शार्क टँक इंडिया सीझन ३ मध्ये त्याचे उद्योजकता स्वप्न AI कार्स सादर केल्या. हर्षलने वयाच्या १९ व्या वर्षी या स्वप्नाला पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. तो जागतिक ऑटोमोबाइल कंपनी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
एकेकाळी कार घेण्याचे बालपणीचे स्वप्न पाहणाऱ्या हर्षलने आर्टिफिशिअल इंटेलिजन्टद्वारे ऑटोमोबाईल उद्योगात क्रांती घडवून आणण्यासाठी आपल्या महत्त्वाकांक्षेला एका प्रकल्पाचे रूप दिले. २०१४ ते २०१९ या काळात इंधन सेलवर काम केल्यानंतर त्याने प्रोटोटाइप तयार करण्यासाठी ६० लाख रूपये आणि वैयक्तिक बचत केलेल्या रकमेची गुंतवणूक केली. ऑटोमोटिव्ह क्षेत्राचा कायापालट करण्याच्या उद्देशासह हर्षलने त्याच्या स्टार्टअपमधील ४ टक्के इक्विटी भाग भांडवलाच्या बदल्यात २ कोटी रूपये गुंतवणुकीची मागणी केली. या शोमधील त्याच्या स्टार्टअपने शार्क्सचे लक्ष वेधून घेतले मात्र या फाउंडरला कोणतीच डिल मिळाली नाही.
शार्क टँकमधील अनुभवाबाबत सांगताना हर्षल म्हणाला, ”आमचा ब्रॅण्ड AiCars.in शार्क टँकमध्येमधील शार्कसाठी मोठी संधी आहे. शार्क्स अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, मात्र जागतिक प्रभाव निर्माण करण्यासह क्रांतिकारी संकल्पना असलेल्या सीड-टप्प्यावरील उद्यमांमध्ये गुंतवणूक करत नाहीत. दुसरीकडे, राष्ट्रीय टेलिव्हिजनवर झळकल्यामुळे आमची क्षमता वाढते, ज्यामुळे इतर साह्य करण्यास उत्सुक असलेल्या संभाव्य गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जाते. अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर आमचे तंत्रज्ञान दाखवण्याची संधी दिल्याबद्दल आभार.”
शार्कच्या नव्या सीजनची सध्या शहरासह गाव खेड्यातील छोट्या मोठ्या उद्योजकांमध्ये देखील जोरदार चर्चा आहे.कारण हा प्रवास लहान शहरांमधील व्यक्तींना जागतिक व्यवसाय क्षेत्रात स्वत:ची छाप निर्माण करण्यास प्रेरित करतो आणि आव्हाने असताना देखील स्वत:चे नावलौकिक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्यासारख्या उद्योजकांच्या अतूट उत्साहात भर पाडतो. सोनी लीव्हवर सध्या हा शो प्रसारित होत आहे.