उड्डाणपुलाचे काम महिन्यात होणार सुरू : डॉ. विखे

नगर  – शहरातील उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात महिन्याभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भात खा. डॉ. विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू होण्यासंदर्भात मागणी केली. याबाबतचे सविस्तर निवेदनही त्यांनी मंत्र्याना दिले. ना. गडकरी यांनी उड्डाणपुलाच्या कामाची वस्तुस्थिती जाणून घेतली.

या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असताना केवळ भूसंपादना अभावी हे काम सुरू होवू शकत नसल्याची माहिती विखे यांनी निदर्शनास आणून दिली. उड्डाणपुलाच्या कामासाठी भूसंपादनाचा कोणताही अडथळा कामात येवू न देता, या कामाला सुरूवात करून, राहिलेले भूसंपादन सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही ना. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले. नगर शहरातील उड्डाण पुलाचा प्रश्‍न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. लोकसभा निवडणुकीत दिलेला शब्दा पाळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.