मुंबई – फर्जंद, फत्तेशिकस्तच्या यशस्वी घोडदौडनंतर दिग्पाल लांजेकर आता ‘पावनखिंड’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की,’स्वराज्य रक्षणासाठी रचलेल्या रणसंग्रामाचं अग्निकुंड आपल्या भगव्या रक्ताने धगधगतं ठेवणाऱ्या मराठ्यांच्या स्वामीनिष्ठेची, त्यागाची आणि पराक्रमाची गौरवगाथा म्हणजे पावनखिंड….18 फेब्रुवारी 2022 रोजी फक्त चित्रपटगृहात!”
View this post on Instagram
दरम्यान,’पावनखिंड’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले असून चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर झळकणार आहे. चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पहायला मिळणार आहे. तसेच मराठी कलाकारांचा भलामोठा फौजफाटा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटाचा अनुभव घेता येणार आहे.