वॉशिंग्टन – वंश्भेदाविरोधात आणि पोलिसांच्या क्रौर्याच्याविरोधात अमेरिकेत सुरू असलेले आंदोलन आता संपूर्ण युरोपभर पसरायला लागले आहे. इंग्लंड, फ्रान्स आदी देशांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरायला लागले आहे. स्थानिक मानवतावादी संघटना जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरायला लागल्या आहेत आणि समूहाने मूक निदर्शने करायला लागल्या आहेत.
अमेरिकेतही मिनियापोलीस पोलिसांच्या क्रौर्याचा निषेध करण्यासाठी अनेक राज्यांमध्ये निदर्शक जमा होऊन निषेध नोंदवू लागले आहेत. मास्क घालून आणि पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणांच्या मागणीचे फलक हाती घेतलेले निदर्शक आता शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त करत आहेत. शनिवारी निदर्शक अनेक सागरी किनाऱ्यावर अनेक ठिकाणी जमले आणि त्यांनी फ्लॉईडच्या हत्येचा निषेध केला.
नॉर्थ कॅरोलिनामध्ये जॉर्ज फ्लॉईडच्या शवपेटीचे दर्शन घेण्यासाठीही अनेकजण जमा झाले होते. जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूला 12 दिवस उलटून गेले तरी अजूनही त्याच्या मृत्यूबाबतचा निषेध धगधगतो आहे. मात्र आता उग्र आंदोलनांची जागा शांत निषेधमोर्चांनी घेतली आहे. युरोपातील दोन शहरांमध्ये संघर्ष सुरू झाल्यावर निदर्शकांनी इतर चार खंडांमध्येही निदर्शने सुरू केली.
सर्वाधिक मोठा मोर्चा वॉशिंग्टनमध्ये कढला गेला. त्यामध्ये रस्त्यांवरून हजारो निदर्शकांनी फ्लॉईडच्या हत्येचा निषेध करण्यासाठी निषेध मोर्चा काढला. आजूबाजूच्या शहरांमधूनही अनेकजण या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. निदर्शकांसाठी अन्न, पाणी आणि मास्कची व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवी संघटनाही पुढे सरसावल्या होत्या.
अनेक निदर्शक व्हाईट हाऊसच्या दिशेने निघाले, त्यांना नव्याने घातलेल्या कुंपणांनी आणि सुरक्षा रक्षकांनी अडवले आणि परत धाडले. या निदर्शकांच्या घोषणा दूरपर्यंत ऐकू येत होत्या. अशांतता रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देणाऱ्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आज आयोजित केले गेले नव्हते.
मोर्चे शांतपणे सॅन फ्रान्सिस्कोमधील गोल्डन गेट ब्रिज आणि न्यूयॉर्कमधील ब्रूकलिन ब्रिज ओलांडून दाखल झाले. ते देशातील म्युझिक-थीम असलेले बार आणि रेस्टॉरंट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या टेनेसीच्या शहर, नॅशविले मधील हॉलीवूडच्या बुलेवर्डस आणि रस्त्यावरही फिरले. फिलाडेल्फिया आणि शिकागोमध्येही मोर्चेकरी घोषणाबाजी करत, फलक हातात घेऊन आणि शांतपणे मोर्चात सहभागी झाले होते.