Sushant Singh : दिवंगत अभिनेता सुशांत सिंगचा ‘दिल बेचारा’ हा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर आता मुकेश छाबरा दिग्दर्शित सुशांतच्या या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ट्विट केले आहे. ‘दिल बेचारा’ जुलै 2020 मध्ये OTT वर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जॉन ग्रीनच्या ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतसोबत संजना सांघी मुख्य भूमिकेत दिसले होते.
‘दिल बेचारा 2’ ची घोषणा करताना, दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी ट्वीट (एक्स)वर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, ‘दिल बेचारा 2.’ मुकेश छाबरा यांच्या पोस्टनंतर, सुशांतचे चाहते सतत ट्विट करून चित्रपटाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुकेश छाबरा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये चित्रपटाच्या कास्टिंग किंवा कथेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. अशा परिस्थितीत आगामी चित्रपटात सुशांतची जागा कोण घेणार याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
Dil Bechara 2
— Mukesh Chhabra CSA (@CastingChhabra) January 16, 2024
दरम्यान, 2020 मध्ये 14 जून रोजी सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्याच्या मृत्यूनंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जे पाहून प्रेक्षक भावूक झाले. आता या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा होताच अभिनेत्याचे चाहते पुन्हा एकदा भावूक झाले आहेत. तसेच त्या ‘दिल बेचारा’ चा सीक्वल येणार असल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.
हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होताच OTT क्रॅश झाला होता. वापरकर्त्यांची संख्या इतकी जास्त होती की प्लॅटफॉर्मवर तांत्रिक बिघाड झाला आणि ते काम करणे बंद झाले होते. याबाबत चित्रपट निर्मात्या हंसला मेहता यांनी ट्विट केले होते.
अनेक रेकॉर्ड केले ब्रेक
या चित्रपटाला IMDB वर 10 पैकी 9.8 स्टार मिळाले होते. त्याला 24 तासांत 95 दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. चित्रपटासोबतच त्याच्या ट्रेलरनेही एक वेगळा विक्रम केला आहे. याच्या ट्रेलरला अवघ्या 24 तासांत 24 दशलक्ष व्ह्यूज आणि 5.2 दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत.