चोरीच्या नऊ दुचाकींसह दोघे जण गजाआड

सातारा – सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी तब्बल नऊ दुचाकी चोरी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तिघांच्या टोळीचा पर्दाफाश केला. यातील दोघांना अटक करण्यात आली. एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. साताऱ्यातील एका युवतीमुळे चोरट्यांची माहिती मिळाल्यानेच टोळी गजाआड झाली. विकास मुरलीधर मुळ (वय 19, रा. पॉवर हाउस झोपडपट्टी, मंगळवार पेठ, सातारा), बाळा उर्फ सुरज किसन सकटे (वय 22, रा. सातारा रोड ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेली सातारा शहर व परिसरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने शाहूपुरी पोलीस चोरट्यांच्या मागावर होते. काही चोरट्यांचा पोलिसांना संशय आल्याने त्यांच्या मागावर होते. हे चोरटे साताऱ्यातील एका परिसरात फिरत असताना त्या परिसरातील एका युवतीने पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांना राजवाडा येथे संशयित दुचाकीवर आढळले. पोलिसांनी थांबण्यासाठी सांगितल्यानंतर ते दुचाकीवरुन पळून जाऊ लागले. पोलिसांनी संशयितांचा पाठलाग करुन पकडले. तिघांना दुचाकीबाबत विचारले असता ते निरूत्तर झाले.

पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातून एक लाख 63 हजारा रुपये किमंतीच्या तब्बल नऊ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेतली आहेत. आम्हाला दुचाकी चालवण्याची हौस असल्याने त्या चोरल्याची कबुली या दोघांनी दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पोलिस हवालदार लैलेश फडतरे, अमित माने, अधिकराव खरमाटे, सचिन माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, मोहन वाघमळे, अमर काशीद, मीना गाढवे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.