बॉलिवूडमध्ये नवीन सिनेमाबाबतची चर्चा नेहमी होतच असते. त्यातही अक्षय कुमारसारख्या स्टारच्या आगामी सिनेमाची चर्चा तर होणारच. अक्षयच्या “सूर्यवंशी’मधून नीना गुप्ता अचानक बाहेर पडल्याचे अलिकडेच समजले होते. खरे तर या सिनेमासाठी तिला साईन करून घेतले होते. तीन दिवसांचे शुटिंगही झाले होते. त्यानंतर तिला बाहेर काढले गेले.
याबाबत आपल्याला रोहित शेट्टीशी बोलायचे होते. पण हे बोलणे होऊ शकले नव्हते. सिनेमातून बाहेर काढल्याचे आपल्याला प्रॉडक्शन असिस्टंटने सांगितले असल्याचे नीना म्हणाली. कदाचित आपल्या रोलला सिनेमाच्या एकूण कथानकामध्ये विशेष महत्वाचे स्थान असल्यामुळे तो रोलच रद्द केला गेला असावा, यापुढे रोहित शेट्टी नवीन सिनेमा करत असल्यास आपण त्याच्याकडे नक्की रोल मागू.
असेही नीनाने स्पष्ट केले आहे. तिच्या या स्पष्टवक्तेपणामुळेच इंडस्ट्रीमध्ये तिचा दबदबा कायम आहे. आता “संदीप और पिंकी फरार’मध्ये अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्राबरोबर नीना गुप्ता दिसणार आहे. मात्र सध्या तरी लॉकडाऊनमुळे ती देखील घरातच अडकून पडली आहे.