बावडा -सुरवड (ता. इंदापूर) येथील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे आज सकाळी आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. येथील 70 वर्षीय व्यक्तीसह त्याची पत्नी (वय 64) व भाऊ (वय 54) अशा तिघांचेही काल मंगळवारी (दि. 21) अकलूज येथे स्वॅबचे नमुने घेतले.
त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिलकुमार वाघमारे यांनी सांगितले. या तिघांवर ही अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच घरा बाहेर पडावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.