पिंपरी – पाच जणांनी मिळून एका भाडेकरू कुटुंबाला मारहाण करून घरातून बाहेर काढले. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी भोसरी येथे घडली.
अर्चना रविंद्र जळमकर (वय 39 रा आनंद टेकाळे यांच्या घरात, भोसरी) यांनी रविवारी (दि. 21) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रमिला अशोक टेकाळे, आनंद अशोक टेकाळे आणि त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी आनंद टेकाळे यांच्या घरात फिर्यादी अर्चना, त्यांचा मुलगा आणि मुलगी असे तिघेजण भाड्याने राहतात. जुन्या भांडणाच्या कारणावरून तसेच फिर्यादी अर्चना यांचे भाडे थकल्याच्या कारणावरून न्यायालयात केस सुरू असल्याचे माहिती असतानाही आरोपींनी फिर्यादी अर्चना आणि त्यांच्या मुलांना शिवीगाळ आणि मारहाण करून घराबाहेर काढले. आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि घराला कुलूप लावले.