नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एलएलबीचा अभ्यासक्रम पाच वर्षांऐवजी तीन वर्षांचा करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. हा बदल करण्याच्या व्यवहार्यतेचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती, परंतु ती स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला. इयत्ता बारावी नंतर विधी पदवीचा अभ्यासक्रम पाच वर्षांचा आहे.
मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले की, पाच वर्षांचा एलएलबी (बॅचलर ऑफ लॉ) अभ्यासक्रम चांगला चालला आहे आणि त्यात छेडछाड करण्याची गरज नाही.
याचिकाकर्त्याने सांगितले की, युनायटेड किंगडममध्येही कायद्याचा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे आणि सध्याचा पाच वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रम हा “गरीबांसाठी, विशेषतः मुलींसाठी निरुत्साही ठरणारा आहे. पण न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला आणि त्यांना ही याचिका मागे घेण्याची सुचना केली. .