तिरुवनंतपुरम – केरळ सरकार येत्या २ मे पासून राज्याच्या माध्यमिक शाळेतील ८० हजार शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देणार आहे. या कार्यक्रमांतर्गत केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशन ने ऑगस्ट २०२४ पर्यंत वर्ग ८ ते १२वी च्या ८० हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.
कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून पीडीएफ, प्रतिमा आणि व्हिडिओंमध्ये जटिल दस्तऐवज सुलभ करण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण माहिती टिकवून ठेवणे अशा कौशल्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. विशिष्ट व्हिज्युअल तयार करण्यासाठी आणि ते संपादित करण्यासाठी ही शिक्षकांना मार्गदर्शन केले जाणार आहेे. शालेय स्तरावर कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रा विषयी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यास पुढाकार घेणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहेे.