जयपूर – फलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या बळावर हरमनप्रित कौरच्या सुपरनोव्हाजने मिताली राजच्या व्हेलॉसिटीचा 12 धावांनी पराभव करत आगेकूच नोंदवली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हाजने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 142 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना व्हेलॉसिटीसंघाला 20 षटकांत 3 बाद 130 धावांचीच मजल मारता आल्याने सुपरनोव्हाजने हा सामना 12 धावांनी आपल्या नावे केला.
143 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या व्हेलॉसिटीची सुरूवात खराब झाली. सलामीवीर हायले मॅथ्युज 11 तर शेफाली वर्मा 12 धावा करुन परतल्यावर कर्णधार मिताली राज आणि डॅनिएली वॅटने व्हेलॉसिटीचा डाव सावरायला सुरूवात केली. मात्र, वॅट 43 धावा करुन परतल्यावर मिताली आणि वेदा कृष्णमुर्तीने फटकेबाजी करत विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, धावा आणि चेंडू यातील अंतर वाढल्याने व्हेलॉसिटीला 130 धावांचीच मजल मारता आली.
तत्पूर्वी, प्रिया पुनिया आणि चमिरा अट्टापटूने सुपरनोव्हाजला चांगली सुरूवात करुन दिली. मात्र, प्रिया पुनिया स्वस्तीांत परतल्यानंतर जेमिमा रॉड्रीग्जला साथीत घेत चमिराने संघाचा डाव सावरला. यावेळी दोघींनी सुपरनोव्हाजला 10 षटकांत 63 धावांची मजल मारून दिली. यावेळी चमिरा 31 धावा करून बाद झाली.
तर दुसऱ्या बाजुने फलंदाजी करणाऱ्या जेमिमाने 160च्या स्ट्राईक रेटने आपले अर्धशतक झळाकावले. यानंतर जेमिमा आणि सोफि एक्सलस्टोनने 6 षटकांमध्ये 50 धावांची भागीदारी नोंदवली. सोफी बाद झाल्यानंतर जेमिमा आणि हरमनप्रितने सुपरनोव्हाजला 142 धावांची मजल मारून दिली. यावेळी जेमिमाने 48 चेंडूंत नाबाद 77 धावांची खेळी केली.