केवळ गुण किंवा गुणवत्ताच नाही, तर विद्यार्थी आत्मसात करतात ज्ञान
आज-काल मुले शाळेत ट्युशन, कोचिंग क्लासमध्ये शिकतात की, नाही याबद्दल पालक चिंताग्रस्त असतात. कारण, सर्व जण केवळ मार्क्स आणि रॅंकसाठी दिशाहीन धावपळ करीत आहेत. मुळात आपल्या शिक्षण व्यवस्थेत अभ्यास नेमका कसा करावा, याचे तंत्र शिकवण्याची पद्धतच अस्तित्वात नाही. या संभ्रमाच्या वातावरणातून पालकांना आणि मुलांना बाहेर काढण्यासाठी मंजुषा वैद्य यांनी दहा वर्षांपूर्वी “सुपरमाइंड’ संस्थेची स्थापना आपल्या तीन महिला सहकाऱ्यांच्या मदतीने केली. “सुपरमाइंड’ने विकसित केलेले कोचिंग नाही, तर दर्जेदार स्व-अध्ययन हे घरी बसून शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याचे एक तंत्र आहे. याचा वापर आठवी, नववी, दहावी आणि बारावीचे विद्यार्थी करू शकतात. त्यासाठी त्यानी देश-विदेशांतील दर्जेदार शिक्षण पद्धतीचा सखोल अभ्यास केला आहे.
पुणे, मुंबई, नागपूरमध्ये स्व-अध्ययनामध्ये मार्गदर्शन केल्यानंतर मंजुषा वैद्य यांनी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यावर आधारित सेल्फ स्टडी मॉडेल कार्यक्रम तयार केले. सीबीएसई आणि एसएससी बोर्डांच्या इंग्रजी व मराठी माध्यमासाठी उपयुक्त असलेले हे मॉडेल लोकप्रिय झाले. यात विद्यार्थी सुपरमाइंड टेस्ट सिरिज घरी सोडवून “सुपरमाइंड’कडे तपासण्यासाठी पाठवतात. यावेळी योग्य उत्तराला गुण दिले जातात आणि अयोग्य उत्तराचे गुण का कापले, त्याचे स्पष्टीकरण दिले जाते. नेमक्या कोणत्या चुकीमुळे मार्क कमी पडले आहेत, हे माहिती झाल्यानंतर विद्यार्थी पुढे चुका करीत नाहीत. चुका जाणा-चुका टाळा हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालक सुखावले. मंजुषा वैद्य यांचे वडील शाळेचे प्रिन्सिपल राहिल्यामुळे त्यांनी या विषयावर चिंतन केल्यामुळे हे शक्य झाले. त्याबद्दल वडिलांप्रती त्या कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. ज्ञानप्रबोधिनी संस्थेमध्ये त्यांनी करियर कौन्सिलिंग केले आहे. याचबरोबर “इन्स्पायर’ ही स्वत:ची कंटेन्ट डेव्हलपमेंट कंपनी काढून मंजुषा वैद्य यांनी आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. त्या शिक्षण आणि विद्यार्थी या विषयावर भरभरून बोलतात. कारण, मुले विकसित झाली तर ते कुटुंब आणि देशही विकसित होतो.
मंजुषा वैद्य म्हणतात, “सुपरमाइंड हा क्लास नाही, किंवा गाइडही नाही. तर विद्यार्थ्याला स्वत: विकसित होण्यासाठी हा सेल्फस्टडी कार्यक्रम आहे. सध्या महाराष्ट्रातील 120 तालुक्यांमध्ये सुपरमाइंड 600 काउन्सिलर आणि 100 पेक्षा जास्त बिजनेस असोसिएट्सद्वारा कार्यरत आहे. सुपरमाइंडद्वारा विनाशुल्क हेल्पलाइन 9049-992-807/08/09 चालवली जाते. येथे प्रश्न विचारल्यानंतर तज्ज्ञ दोन तासांतच विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करतात. त्याचबरोबर 10 वी, सीबीएससी, 12 वी विज्ञान शाखेसाठी सुपरमाइंड परीक्षेच्या तयारीकरिता तत्काळ मटेरियल उपलब्ध करते. सुपरमाईंड विद्यार्थ्यांना स्व-शिक्षणासाठी प्रेरणा देऊन तयार करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थी स्वतः शिकत असल्यामुळे पालकांची चिंता दूर होते. पालकांना स्वतः शिक्षक होण्याची गरज पडत नाही.
सध्या ई -लर्निंगचा बोलबाला असला, तरी सुपरमाइंडने 8 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील 1 हजारपेक्षा जास्त शाळांत 30 हजार विद्यार्थ्यांसाठी ही संकल्पना यशस्वीपणे राबवली आहे. या संकल्पनेनुसार विद्यार्थी ई-लर्निंगद्वारा अभ्यासातील संकल्पना पक्क्या करू शकतात. कोणत्याही शहरातून विद्यार्थी सेल्फ स्टडीचा लाभ घेऊ शकतात. शैक्षणिक हेल्पलाइनद्वारे विद्यार्थी थेट तज्ज्ञ शिक्षकांच्या संपर्कात राहतात. ई-लर्निंग कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर आता मंजुषा वैद्य व्हर्च्युअल काउन्सिलिंग आणि डिजिटल प्रोग्राम/ऍप विकसित करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल काउन्सिलिंगच्या माध्यमातून सुपर माइंडच्या तज्ञांशी थेट संपर्क साधता येईल. ऍपमुळे विद्यार्थ्यांना सर्व बाबी एकाच व्यासपीठावर उपलब्ध होऊ शकतील. सुपर माइंडने शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर एक प्रकारे क्रांतीच घडवून आणली आहे. यामुळे हजारो एकलव्य निर्माण होण्याच्या शक्यता खुल्या झाल्या आहेत.
सुपरमाइंडच्या दहाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सुपर माइंडने सुपरमाइंड फाउंडेशन सुरू केले असून, या माध्यमातून “मिशन एज्युकेशन’ सुरू केले आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा उद्देश यामागे आहे. या कामाबरोबरच मंजुषा वैद्य या विषयाबाबत वातावरण निर्मिती करण्यासाठी नियतकालिकात लिखाण करतात, व्याख्याने देतात. अर्थात त्यांना मिळालेल्या कार्यक्षम आणि सेवाभावी कर्मचारी वर्गाच्या निरंतर सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे सुपर माइंडला बिझनेस एक्सलन्स अवार्ड, मॉरिशससारखे पुरस्कार मिळाले आहेत. स्वत: व्यवसाय करत असताना रोजगार्निर्मितीत त्यांचे योगदान आहे. महाराष्ट्रात त्यांचे 750 प्रतिनिधी कार्यरत आहेत. महिला व्यवसायिक म्हणून त्या यशस्वी असताना त्यांच्याकडे सर्वाधिक महिला कर्मचारी काम करतात. महिलांना प्राधान्याने नोकरी देणे व त्यांना सक्षम बनवणे यावर त्या भर देतात.
पत्ता; 721/1/14 प्रशांतनगर, नवी पेठ, काका हलवाईजवळ,
लाल बहाद्दूर शास्त्री रस्ता, पुणे – 411030
supermindstudy.com
info@supermindstudy.com
संकलन
महादेव मिसाळ
प्रतिनिधी