कार्यालयात जाणारे पुरुष रोजच्या रोज पॅंट शर्ट घालूनच जातात. त्यांच्या सवयीचा तो भाग होतो. पण अनेकदा पॅंटचा पट्टा अतिघट्ट बांधला जातो. मात्र रोज कंबरेवर घट्ट पट्टा बांधण्याची सवय केवळ शरीराचे नुकसान करत नाही तर प्राणघातकही ठरू शकते.
दीर्घ काळ घट्ट पट्टा बांधल्याने पोटाचे आजार होऊ शकतात. एवढेच नव्हे तर गळ्याचा कर्करोगही होण्याची शंका असते. दिवसभर घट्ट बेल्ट बांधण्याची सवय असेल तर हीच वेळ आहे की या सवयीतून मुक्त व्हा.
सांध्याची समस्या वाढते
दीर्घ काळ घट्ट पट्टा बांधल्याने मणक्याची हाडे आखडतात. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये बदल झाल्याने गुडघ्याच्या सांध्यावर गरजेपेक्षा अधिक दाब पडतो त्यामुळे सांधेदुखीच्या वेदना सुरू होतात.
पचनामध्ये समस्या
घट्ट पट्टा लावल्याने अन्न पचन चांगल्या प्रकारे होत नाही. त्याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्या देखील भेडसावते.
पोटाच्या नसांवर दाब
कंबरेवर घट्ट पट्टा बांधल्याने पोटाच्या स्नायूंचे कार्य करण्याची पद्धत बदलते. दिवसभर पोटाच्या नसा दबल्या जातात. सतत घट्ट पट्टा बांधल्याने कटी प्रदेशातून येणाऱ्या धमन्या, रक्तवाहिन्या, स्नायू आणि आतडे यांच्यावर दाब येतो.
शुक्राणुंची संख्या कमी
दिवसभर पट्टा घट्ट बांधून ठेवल्यास पुरूषांमध्ये शुक्राणुंची संख्या कमी होते. त्यामुळे पुरूषांमधील वंधत्व वाढण्याची शंका असते.
घशाचा कर्करोग
ज्या व्यक्ती खूप लठ्ठ असतात आणि घट्ट पट्टा लावतात त्यांची अन्ननलिका आणि पोट यांच्यातील वॉल्व मध्ये जास्त दाब पडतो. त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स किंवा घशाशी येण्याचा त्रास होतो. कारण पोटात तयार होणारे आम्ल घशाशी येते. त्या आम्लामुळे घशाच्या पेशी नष्ट होतात. पेशी नष्ट झाल्याने घशाचा कर्करोग होऊ शकतो.
पायाला सूज
खूप घट्ट बेल्ट बांधला तर कंबरदुखी ची समस्या उद्भवते. त्याशिवाय कंबरेच्या आजूबाजूला दबाव निर्माण झाल्याने पावलांना सूज येण्याची समस्या निर्माण होते.