चिंबळी – बैलगाडा शर्यत बंदी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त उठवल्याने चाकण (ता. खेड) मधील बैल बाजारात कमी झालेले बैलांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. या बैल बाजारात शनिवारी (दि. 18) 135 बैल विक्रीसाठी आले होते.
यातील शर्यतीच्या खोंडाना 45 हजार रुपयापर्यंत भाव मिळाल्याचे पशुपालक शेतकऱ्यांनी सांगितले. चाकणच्या बैल बाजारात शर्यतीच्या खिल्लार, म्हैसूर,गावरान, माणदेशी बैलांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.