नवी दिल्ली – महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती. ज्याचा व्हिडिओ काल म्हणजेच रविवारी समोर आला आणि राजकारण तापलं. या प्रकरणावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असतानाच आता भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे.BJP
हेमा मालिनी म्हणाल्या की, हा ट्रेंड काही वर्षांपूर्वी लालूजींनी सुरू केला होता, तेव्हापासून प्रत्येकाने या ट्रेंडचा वापर केला. सामान्य माणसे असे बोलत असतील तर समजू शकते मात्र संसद सदस्य असे बोलत असतील तर ते योग्य नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
राज्य सरकारमधील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते की, 30 वर्षांपासून आमदार असलेल्यांनी माझ्या विधानसभा मतदारसंघात येऊन रस्ते पाहावेत. ते (रस्ते) हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन. असे वक्तव्य पाटील यांनी केले होते.