करोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती सध्या तरी नाही

सहायक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नाईक यांची माहिती

पुणे – दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येणार, असा अंदाज होता. तशी परिस्थिती अद्यापतरी नसल्याचे बाधितांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दिवाळीनंतर साधारणपणे 15 डिसेंबरपर्यंतचा काळ बाधितांची आकडेवारी वाढण्याचा असेल, असे वाटत होते. दुसऱ्या लाटेपेक्षा पहिल्या टप्प्यात झालेल्या संसर्गातीलच हे बाधित असतील, असा अंदाज आहे.

शहरात नवे 298 करोना पॉझिटिव्ह
शहरात शुक्रवारी आणखी 298 करोना बाधितांची नोंद करण्यात आली, तर आठ जणांचा मृत्यू झाला. त्यातील तीन रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

दिवसभरातील बाधितांचा समावेश करून करोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 75 हजार 415 झाली आहे, तर त्यातून बरे झालेल्यांची संख्या 1 लाख 65 हजार 790 आहे. सध्या ऍक्‍टिव्ह बाधितांची संख्या 5061 आहे. यातील 379 जण क्रिटिकल असून, त्यातील 231 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

तर आजपर्यंत करोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 4,564 आहे. शुक्रवारी 3658 जणांची स्वॅबटेस्ट घेण्यात आली, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.