बंगळुरू – ऑडी कार वेगात विजेच्या खांबाला धडकून भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात तामिळनाडूचे आमदार वाय प्रकाश यांचा मुलगा आणि सूनेचा समावेश आहे. हा अपघात बंगळुरू शहरातील कोरोमंगलामध्ये रात्री पावणे दोनच्या सुमारास झाला आहे.
भीषण अपघात : ऑडी कारची विजेच्या खांबाला जबर धडक, आमदाराच्या मुलगा आणि सूनेसह सात जणांचा मृत्यू; अपघात सीसीटीव्हीत कैद pic.twitter.com/riCwnlXQB1
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) August 31, 2021
ऑडी कार अती वेगात असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार समोर असलेल्या विजेच्या खांबाला धडकली आहे. अपघात कारचा जागेवरच चुराडा झाला असून यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा रुग्णालयात जात असताना मृत्यू झाला आहे. मृत्यामंध्ये तीन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे.
Karnataka: Seven people killed in a car accident in Koramangala area of Bengaluru in the wee hours of Tuesday, as per Adugodi Police Station pic.twitter.com/GTcob09pG4
— ANI (@ANI) August 31, 2021
करुणा सागर, बिंदू (28), इशिता (21), डॉ. धनासु (21), अजय गोयल, उत्सव आणि रोहित (23) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यामध्ये कार अती वेगाने असल्याचे दिसून येत आहे.