मुळा धरण निम्मे भरले

राहुरी  – 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे मुळा धरणातील पाणी साठा आज निम्मे भरले. धरणात सायंकाळी सहा वाजता 12 हजार 674 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून आज मध्यरात्री ते निम्मी पातळीवर जाईल. जुलै महीन्यात धरणात सुमारे नऊ हजार दशलक्ष घनफुटाने पाणी नव्याने आल्याची माहिती शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली.

गतवर्षी याच वेळी धरणातील पाणीसाठा 15787 दशलक्ष घनफुट होता. गतवर्षी पेक्षा तो 2487 दशलक्षघनफुटाने कमी आहे. जून अखेरीस धरणातील पाणी साठा 4300 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. 15 जुलै सायंकाळी सहा वाजता पाणीसाठा 7766 दशलक्ष घनफूट होता.

31 जूलैस पाणीसाठा 12674 दशलक्ष घनफूट झाला. जुलैच्या पहिल्या पंधवड्यात पाणीसाठा 3108 तर पुढील पंधरवड्यात 5534 दशलक्ष घनफुटाने वाढला. या हंगामात सर्वाधिक आवक वीस हजार क्‍युसेक ची होती. धरणात आज सकाळी सहा वाजता आवक 6592 क्‍युसेक होती. सायंकाळी सहा वाजता आवक दुपटीने वाढली. ती 13836 क्‍युसेक होती.

असा वाढला पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)सायंकाळी सहाची आकडेवारी
7 जुलै ः 4705, 15 जुलै ः7766, 22जुलै ः8218, 25जुलै ः8362, 26 जुलै 8521, 27 जुलै 9020, 28 जुलै 10048, 29 जुलै 10968, 30 जुलै 11968, 31 जुलै 12674.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.