बारामतीत रिक्षाचालक करतोय अनेक मुद्द्यांवर प्रबोधन

बाह्य सजावटीसह अनेक सामाजिक विषयावर संदेश

जळोची – ऑटोरिक्षा हे दैनंदिन जीवनातील वाहतुकीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे रिक्षा आणि रिक्षा चालक नेहमीच चर्चिले जातात. बारामतीतील असाच एक अवलिया रिक्षावाला प्रवाशांना सुविधा देण्याबरोबरच त्यांच्यात विविध मुद्यांवर जनजागृती करीत आहे. प्रवास दरम्यान समाज परिवर्तनाचे संदेश देणारे हे रिक्षावाले काका सध्या बारामतीत चर्चेचा विषय ठरले आहेत.

कामावर जायला उशिर झायला… बघतोय रिक्षावाला गं… वाट माझी बघतोय रिक्षावाला… या प्रसिद्ध गाण्यातून संपूर्ण रिक्षा चालक चर्चेचे विषय बनले होते.रिक्षा चालक म्हंटल की, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दुय्यम होतो. मात्र, बारामती येथील दत्तात्रय माने यांनी त्यांच्या रिक्षात अनेक पर्यावरण पूरक, मानव हिताचे संदेश देऊन जनजागृतीचे कार्य सुरू ठेवल्याने रिक्षावाला याला ते अपवाद ठरत आहेत.

प्रवाशांच्या सेवेसाठी माने यांनी त्यांच्या रिक्षात मोबाइल चार्जिंग, पिण्यासाठी फिल्टर पाणी, थंड हवेसाठी कुलर प्रवासादरम्यान वाचण्यासाठी विविध दैनिक व मासिक तसेच कॅलेंडर, घड्याळ, प्रथमोपचार पेटी आणि ज्येष्ठांसाठी उपयोगी सुविधा तसेच मुलगी शिकली प्रगती झाली…, मुलगी वाचवा जीवनदान द्या.., झाडे जगवा पशुपक्षी वाचवा…, झाडे लावा पर्यावरण वाचवा…, स्वच्छ भारत हरित बारामती… या सारखी ब्रीद वाक्‍य रिक्षात लिहली आहेत. रिक्षाच्या दर्शनी काचेवर पशु, पक्षी, चंद्र, सूर्य, तारे या चित्रांच्या माध्यमातून माने हे पर्यावरण संवर्धनासह समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.