नवी दिल्ली – जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र नागरिक आदेशाचे उल्लंघन करत रस्त्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर फिलिपाइन्सचे राष्ट्रपति रोड्रिगो दूर्टेटे यांनी सैन्याला पाचारण केले असून लॉकडाउनचे उल्लंघन करुन विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना थेट गोळ्या घालण्यात येतील, असा इशारा त्यांनी जनतेला दिला आहे.
रोड्रिगो दूर्टेटे यांनी म्हंटले कि, दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळेच मी तुम्हाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याचं आवाहन करत आहे. तुम्हाला माझे म्हणणे ऐकावे लागणार आहे. जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तुमच्या कामात अडथळा आणत असेल, वाद घालून तुमचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा लोकांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश मी पोलिसांना आणि लष्कराला दिले आहेत. तसेच वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मी काय बोलतोय हे तुम्हाला समजत असेल. तुम्हाला त्रास देण्याऐवजी थेट तुम्हाला ठार करुन पुरले जाईल, अशा कठोर शब्दामध्ये त्यांनी जनतेला इशारा दिला आहे.
दरम्यान, फिलिपाइन्समध्ये करोनाबाधितांची संख्या २ हजार ३११वर गेला आहे. तर आतापर्यंत ९६ जणांचा मत्यू झाला आहे.