दुर्मीळ सापाला जीवदान

रसेल कुकरी सर्प : वर्ल्ड फॉर नेचरचा पुढाकार

चिंचवड – पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच दुर्मीळ असलेला “रसेल कुकरी’ जातीचा बिनविषारी साप आढळला. वर्ल्ड फॉर नेचर संस्थेने त्याला जीवदान देत योग्य अधिवासात सोडले. काकडेपार्क येथून बुधवारी रात्री दहा वाजता एका रहिवाशाने साप दिसल्याचे संस्थेच्या सदस्यांना सांगितले. यानंतर संस्थेचे सदस्य राजेश कांबळे, योगेश कांजवणे यांनी जाऊन सापास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला योग्य अधिवासात सोडून दिले.

संस्थेचे अध्यक्ष शुभम पांडे म्हणाले की, हा दुर्मिळ जातीचा साप प्रथमच शहरात सापडला आहे. वर्षा वनात प्रामुख्याने हा आढळतो. हा दिनचर व निशाचर असून शांत स्वभावाचा पण चिडला तर शरीर फुगवून हल्ला करतो. याचे अन्न प्रामुख्याने छोटे-मोठे कीटक आणि बेडूक, उंदीर आहे. पर्यावरणातील प्रादुर्भाव करणारे कीटक कमी होण्यास या सापाची मदत होते.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)