New York Times Square: अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठी भारतासह परदेशात देखील आनंदाचे वातावरण झाले आहे. भाविकांच्या जय श्रीरामाच्या घोषणांनी अयोध्येतील रस्ते दुमदुमून गेले आहेत. राम भक्तांचा हाच जल्लोष अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर येथे देखील पाहायला मिळाले.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर येथे रामभक्तांची मोठी गर्दी जमली. तसेच ढोल ताशांचा गजर पाहायला मिळाला. यावेळी भारतीय महिलांनी राम आयेंगे गाण्यावर नृत्याचा आनंद घेतला. तसेच रामाची गाणी, भजन-कीर्तन म्हणत लोक म्हणताना दिसत आहे. येथील काही व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
This is Not Visuals from Mumbai or Delhi
These are Bhartiyas Celebrating Ram Mandir Inauguration from TIMES Square , Newyork in USA
Amazing Energy of Hindus Across The World.#JaiShreeRam #AyodhaRamMandir #RamLalla #RamMandirPranPrathistha pic.twitter.com/wyYDyHSfNL
— Dr. Mahesh Joshi 🇮🇳 (@MaheshJoshi_MJ) January 22, 2024
Indian diaspora illuminated Times Square, New York to celebrate the Pran Prathistha ceremony at Ram Mandir, Ayodhya.
(Pics: Consulate General of India, New York’s ‘X’ account) pic.twitter.com/Y4Vq3TmAri
— ANI (@ANI) January 22, 2024
विशेष म्हणजे या सोहळ्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण केले जात आहे. शेकडो भारतीय आणि अमेरिकन भाविक भगवान श्रीरामाचे दर्शन घेऊन आणि मंत्रोच्चार करून सोहळ्याचा आनंद लुटत आहेत. टाइम्स स्क्वेअरच्या मोठ्या होर्डिंगवर भगवान राम, सीतामाता व लक्ष्मण यांचे फोटो झळकत आहेत. अमेरिकेतील वातावरण देखील राममय झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच याठिकाणी नृत्य सादरीकरण, भजन-कीर्तनद्वारे रामकथेतून सांगण्यात आले आहे.