Ram Mandir : देशभरातील रामभक्तांची 500 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण आज अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठाचा सोहळा पूर्ण झाला आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात रामलला विराजमान आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्यासह संघ प्रमुख मोहन भागवत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आनंदीबेन हे गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा पूजेसाठी दाखल झाले आहेत.
PM Narendra Modi unveils the Ram Lalla idol at the Shri Ram Janmaboomi Temple in Ayodhya
#RamMandirAyodhya pic.twitter.com/qaunSkpyg1
— ANI (@ANI) January 22, 2024
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात राम लालाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. सर्व पूजा विधी पूर्ण करून रामलला राम मंदिरात विराजमान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री रामजन्मभूमी मंदिरात राम लालाची आरती केली. पंतप्रधान, ज्यांनी यापूर्वी 11 दिवसांचा विधी केला, त्यांनी भगवान विष्णूच्या प्रार्थनेने सुरू झालेल्या ‘प्राण प्रतिष्ठा’ विधीचे नेतृत्व केले.
पंतप्रधान मोदी, संघ प्रमुख भागवत आणि मुख्यमंत्री योगी प्राणप्रतिष्ठा विधीचे यजमान बनले. पूजा सुरु असताना श्री रामजन्मभूमी मंदिर परिसरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
दरम्यान, या पूजेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीम कलरचा कुर्ता आणि धोतर परिधान केले आहे. रामललाला चांदीची छत्री घेऊन पंतप्रधान मोदी पोहोचले होते.