Raj Thackeray : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठपणेचा सोहळा नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. यानिमित्त सर्वत्र राममय वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. यानंतर देशभरात उत्सहाचं वातावरण निर्माण झालं आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी प्रभू श्री रामाच्या मनमोहक मूर्तीचा व्हिडीओ ट्वीट अर्थात एक्सवर शेअर केला आहे. सोबत त्यांनी लिहिले की, “आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली! जय श्रीराम!.” दरम्यान, 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज भगवान श्री राम त्यांच्या भव्य आणि दिव्य मंदिरात आज निवास करणार आहे. या निमित्याने अयोध्या नगरी सजली आहे.
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली !
जय श्रीराम !आज कारसेवकों की आत्मा प्रफुल्लित है और 32 साल बाद शरयू नदी प्रसन्न व हर्षित है।
जय श्रीराम!Sharayu smiles after 32 years as the souls of Karsevaks rejoice!
Jai ShreeRam! pic.twitter.com/w9Yz7eBEdW— Raj Thackeray (@RajThackeray) January 22, 2024
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात राम लालाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. सर्व पूजा विधी पूर्ण करून रामलला राम मंदिरात विराजमान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री रामजन्मभूमी मंदिरात रामललाची आरती केली. पंतप्रधान, ज्यांनी यापूर्वी 11 दिवसांचा विधी केला, त्यांनी भगवान विष्णूच्या प्रार्थनेने सुरू झालेल्या ‘प्राण प्रतिष्ठा’ विधीचे नेतृत्व केले.