आद्य क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारकाच्या भुसंपादनासाठी लागणाऱ्या निधीचा प्रश्न मार्गी

पुणे – क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक समितीची बैठक अजितदादा पवार यांनी पुण्यात घेऊन समितीच्या कामाचा आढावा घेतला. स्मारकाच्या भुसंपादनासाठी लागणा-या १०० कोटी रुपयांच्या तरतुदीसाठी समितीचे शासकिय अध्यक्ष , तसेच जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांचेसोबत संयुक्त चर्चा केली. 

ऊपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीच्या वेळी समाजकल्यान मंत्री धनंजय मुंडे यांना त्वरित दुरध्वनीवरुन संपर्क केला आणि १०० कोटी निधी देण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशी विनंती करुन स्मारकाच्या भुसंपादनासाठीच्या निधीबाबतचा प्रश्न मार्गी लावला. यावेळी महाराष्ट्र ॲालंपिक असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दादांचा सन्मान करुन शुभेच्छा दिल्या

आजच्या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव , जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार , समितीचे शासकिय अध्यक्ष विजयबापु डाकले, नगरसेवक सुभाष जगताप, समितीचे सदस्य बाळासाहेब भांडे, राजभाऊ धडे, शांतीलाल मिसाळ, रवी पाटोळे, निलेश वाघमारे हजर होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.