राजेंद्र वाघमारे
नेवासा – देवगड फाटा (ता.नेवासा) येथील नाफेड कांदा खरेदी केंद्रावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणून वाहनांजवळच गेल्या तीन – चार दिवसांपासून मुक्काम ठोकला नंबर येण्याच्या आशेपायी शेतकरी कांद्याच्या वाहनाला राखण राखून कांदा खरेदी बंद झाली माञ या केंद्रावर नंबरला लागलेल्या शेतकऱ्यांचा कांदा नाफेड खरेदी केंद्रात घेतला गेला नाही त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांसह शेतकरी संघटना अधिक आक्रमक झालेल्या असतांना पुन्हा कांदा खरेदी सुरु करण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांतून केली जात आहे.
कांद्याच्या बाजारभावात यंदा मोठी घसरण झालेली आहे.
माञ गरजवंताला अक्कल नसते या उक्तीप्रमाणे मिळेल ‘त्या’ भावात शेतकरी कांदा विक्रीसाठी नाफेडच्या खरेदी केंद्रावर वाहने नंबरला लावून चार – पाच दिवस बसलेले असतांना अचानक कांदा खरेदी बंद झाल्यामुळे शेतकरीवर्गातून प्रचंड रोष व्यक्त केला जात असून सरकारच्या भूमिकेबाबत तिव्रसंताप पसरत आहे.
कांद्याच्या पिकातून शेतकऱ्यांना यंदा दोन पैसे हाती लागतील या भोळ्या अपेक्षेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा पीक घेतले आहे कांदा हे पीक सडके असल्यामुळे कांदा चाळीतून पीक बाहेर काढून गाडीत कांदा गोण्या विक्रीसाठी घेवून जावूनही नाफेड कांदा खरेदी बंद झाल्यामुळे अर्थिक भुर्दंड शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे त्यामुळे भाव कमी मिळूनही खरेदी बंद झाल्यामुळे शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले आहेत.
यंदा कांद्याने भावात वांदा केला असला तरी सडकी वस्तू कांदा चाळीत ठेवण्यापेक्षा चलन मोकळे करुन घेण्यात शेतकरीवर्ग धन्यता मानत असला तरी कांदा खरेदी बंद झाल्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त केल्या जात आहेत