खंडपीठाच्या मागणीसाठी पुणे बार असोसिएशनने घेतली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

पुणे – मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.

त्यावेळी पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. श्रीकांत आगस्ते, उपाध्यक्ष ऍड. रुपेश कलाटे, ऍड. रवी लाढाणे, सचिव ऍड. केदार शिंदे, ऍड. मनिष मगर, खजिनदार ऍड. सचिन गेलडा, सभासद ऍड.प्रशांत वाटविसावे, ऍड. तृशांत वेडेपाटील, ऍड. तुषार कुऱ्हाडे तसेच माजी उपाध्यक्ष ऍड. हेमंत झंजाड, ऍड.अमर जाधव, माजी सचिव ऍड.विवेक भरगुडे, माजी सचिव ऍड. सचिन हिंगणेकर, ऍड. मंगेश लेंडघर, ऍड.पांडुरंग थोरवे, ऍड.के.टी. आरु, ऍड. लक्ष्मण घुले, ऍड. योगेश तुपे, ऍड.अमोल भुजबळ यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते.

पुणे, औरंगाबाद येथे खंडपीठ स्थापन होण्याच्या प्रस्ताव 1978 मध्ये विधी मंडळात मंजुर झाला आहे. त्यानुसार 1981 मध्ये औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाले आहे. मंजुरीला 30 वर्षे उलटून गेली आहेत. तरीही येथे अद्याप खंडपीठ सुरू झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर पाठपुरावा करून सरकारने त्वरित खंडपीठ सुरू करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.