वॉशिंग्टन – अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि महासत्ता असली तरी काही मूलभूत समस्यांचा सामना अद्यापही या अर्थव्यवस्थेला करावा लागत आहे नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालाप्रमाणे अमेरिकेतील पब्लिक टॉयलेटची अवस्था अतिशय वाईट आहे जागतिक स्थितीचा विचार करता एक लाख लोकसंख्येमागे अमेरिकेत फक्त 8 टॉयलेटस् आहेत,
दुसरीकडे आईसलँडसारख्या छोट्या देशामध्ये एक लाख लोकसंख्येमागे तब्बल 56 टॉयलेट आहेत ब्रिटनमधील स्वच्छतेबाबत काम करणाऱ्या एका एनजीओने संशोधन केले असून त्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये जगभरातील विविध देशांमधील पब्लिक टॉयलेटच्या उपलब्धतेचा करण्यात आला आहे या अहवालामध्ये भारताचा समावेश नाही पण अमेरिकेसारख्या देशांमधील वाईट परिस्थिती समोर आणण्यात आली आहे एकेकाळी पब्लिक टॉयलेटची यंत्रणा उभारण्यामध्ये अमेरिका जगात प्रथम क्रमांकावर होते.
पण गेल्या काही वर्षांमध्ये महानगरांमधील पब्लिक टॉयलेटची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे त्यामुळे त्याचा ताण या महानगरांमधील हॉटेल, पब आणि बारवर पडला आहे पब्लिक टॉयलेट मेंटेन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येत असल्यानेच अनेक स्थानिक प्रशासनांनी अशा प्रकारची पब्लिक टॉयलेट बंद करण्याचा किंवा नवीन सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे या व्यतिरिक्त अनेक शहरांमधील पब्लिक टॉयलेट्स म्हणजे चरसी आणि व्यसनी लोकांचा अड्डा होऊ लागल्याने सामाजिक संघटनांच्या तक्रारीनंतर सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
अमेरिकेमधील पब्लिक टॉयलेटची यंत्रणा सर्वात आदर्श मानली जात होती तेव्हा त्या व्यवस्थेला कम्फर्ट स्टेशन असे म्हटले जात असे सार्वजनिक उद्याने किंवा मोठे चौक या परिसरामध्ये ही पब्लिक टॉयलेट उभारली जात होती कालांतराने त्याचे तोटे लक्षात येऊ लागल्याने सर्व स्थानिक प्रशासन संस्थांनी या विषयाकडे आता दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे सर्व सामान्य नागरिकांसाठी ही सोय आता उपलब्ध होत नसल्याने अनेक नागरिक आता परिसरातील हॉटेल्स बार क्लब या ठिकाणी जाऊन तेथील टॉयलेटचा वापर करू लागली आहेत त्यातून एक वेगळी समस्या आता निर्माण होऊ पाहत आहे.