प्रयागराज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील एका कार्यक्रमात उत्तरप्रदेशातील महिला बचत गटांच्या सुमारे 16 लाख महिलांच्या खात्यावर एक हजार कोटी रूपयांची मदत ट्रान्स्फर केली आहे.
दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या अंतर्गत ही मदत देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला आज महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथही यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी यावेळी मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजने अंतगेत एक लाख महिलांना सुमारे 20 कोटी रूपयांचेही वाटप यावेळी केले. या अंतर्गत प्रत्येकी पंधरा हजार रूपयांची मदत लाभार्थ्यांना देण्यात येत आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी पुरक पोषण पदार्थ उत्पादन करणाऱ्या 202 युनिट्सचा पायाभरणी समारंभही मोदींच्या हस्ते झाला. 43 राज्यांमध्ये ही केंद्रे सुरू केली जाणार आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून ही केंद्रे चालवली जाणार आहेत.