नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची मागणी एका नागरिकाने केली होती. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला माहिती कायद्याअंतर्गत अर्ज केला होता.
त्यावर पंतप्रधान कार्यालयाने उत्तर दिले आहे. पंतप्रधानांना नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची गरज नाही असे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
If PM @narendramodi does not require to register his citizenship, as per Section 3 of the Citizenship Act 1955, then why should others?
Here is the PMO’s response to an RTI filed by Subhankar Sarkar (632/2020-PME) #CAA_NRC_NPR #DelhiRiot2020 #DoubleStandards pic.twitter.com/WydrnFMZt8— seemi pasha (@seemi_pasha) February 29, 2020
पीएमओने दिलेल्या माहितीनुसार नागरिकत्व कायदा 1955 च्या कलम 3– अन्वये पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मापासूनच भारतीय आहेत. आणि त्यांच्या भारतीय होण्याचा हाच मूळ आधार आहे. त्यामुळे त्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्नच निर्माण होत नाही.