इंडोनेशियामध्ये विडोडो पुन्हा अध्यक्ष बनण्याची शक्‍यता 

जकार्ता (इंडोनेशिया) – इंडोनेशियामध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये अध्यक्ष जोको विडोडो यांना दुसऱ्यांदा बहुमत मिळण्याची चिन्हे आहेत. प्राथमिक निकालांनुसार विडोडो यांना विरोधी नेते प्राबोवो सुबियान्तो यांच्या विरोधात देशभरातून मोठी आघाडी मिळाली आहे. त्यामुळे विडोडो यांना 5 वर्षांची आणखी एक टर्म मिळणार असे चित्र आहे.

विडोडो यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळणे म्हणजे इंडोनेशियामध्ये लोकशाही वातावरण रुजायला लागल्याचे निदर्शक असल्याचे मानले जात आहे. सुहार्तो यांच्या अध्यक्षपदाच्या काळातील लष्करी जनरल असलेले सुबियान्तो यांनी देशाला समर्थ नेता आवश्‍यक असल्याच्या मुद्दयावरून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांच्या अध्यक्ष बनण्याने देशावर लष्करी शासन लादले जाण्याचा धोका विडोडो यांनी मांडला होता.

देशातील दारिद्रय हटवणे आणि इंडोनेशियातील अपुऱ्या पायाभूत सुविधांची सुधारणा यावर विडोडो यांनी प्रचारामध्ये विशेष भर दिला होता. बंदरे, रस्ते आणि विमानतळांच्या सुधारणांबरोबर जकार्तामधील गजबजाट दूर करण्यासाठी भुयारी मार्गांचा अवलंब करण्याची योजना त्यांनी स्वीकारली आहे. 2014 सालच्या अध्यक्षीय निवडणूकीतही सुबियान्तो यांना विडोडो यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.