अंटार्टिक : जगाचे एक टोक मानण्यात येणाऱ्या बर्फाळ अंटार्टिकामध्ये प्रथमच विमान उतरवण्यात आले आहे. 280 प्रवासी क्षमतेचे एक विमान 3000 फूट धावपट्टीवर उतरवण्यात आले. ही घटना दोन नोव्हेंबर रोजी घडली असली तरी आत्ता कंपनीतर्फे त्याची माहिती व्हिडीओ मार्फत देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून हाय फ्लाय नावाचा विमान कंपनीने एस 430 नावाच्या विमानातून हे उड्डाण केले. पाच तासांच्या प्रवासानंतर हे विमान अंटार्क्टिकाच्या बर्फांळ क्षेत्रातील धावपट्टीवर पोहोचले. जागतिक खरव तर या प्रदेशात वर्षभर बर्फ असतो त्यामुळे विमानाची धावपट्टी बर्फावर तयार करण्यात आली आहे.
गेले वर्षभर याबाबतची चाचणी सुरू होती. अखेर हाय फ्लाय या कंपनीने केपटाऊनमधून विमान प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि दोन नोव्हेंबर रोजी हा निर्णय प्रत्यक्षात आला. हाय फ्लाय ही दक्षिण आफ्रिकेतील एक महत्त्वाचे कंपनी असून अनेक क्षेत्रांमध्ये ती कार्यरत आहे.
अंटार्टिकामध्ये येत्या काही कालावधीमध्ये पर्यटनाचे प्रमाण वाढणार असल्याने त्यांनी प्राधान्याने तेथे विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे विमान तेथे लँड करण्यात आले. या प्रदेशातील कोणत्याही भागामध्ये एकही विमानतळ नाही पण पन्नास लँडिंग स्ट्रिप आणि रनवे मात्र तिथे उभारण्यात आले आहेत. त्यावर हे विमान उतरवण्यात पहिला मान कॅप्टन कार्लोस मिरपुरी यांना मिळाला ते या कंपनी चे व्हाईस प्रेसिडेंटही आहेत.