युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ‘या’ गुलाबी शहराचा समावेश

नवी दिल्ली: युनेस्को या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने गुलाबी रंगाचे शहर म्हणून ओळख असलेल्या जयपूरला जागतिक वारसा लाभलेला आहे. याबाबत युनेस्कोने ट्विटमध्ये म्हटले आहे,की  राजस्थानातील जयपूर शहराची निवड वारसा स्थळांच्या यादीत केली आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक अझरबैजान येथील बाकू येथे ३० जूनला सुरू झाली असून १० जुलै पर्यंत चालणार आहे.

जागतिक वारसा यादीत जयपूरची निवड झाल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. त्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, जयपूर शहराचा संबंध हा संस्कृती व शौर्याशी आहे. जयपूरचे आदरातिथ्य व त्याचे सौंदर्यही वेगळे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.