मुंबई – महाविकास आघाडीसह शिवसेनेला धारेवर धरणारे भाजपचे नेता अतुल भातखळकर यांनी नुकतच एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी एक फोटो ट्विट करत शिवसेनेवर विखारी टीका केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सत्ताधारी शिवसेनेवर भातखळकर वारंवार टीका करत होते. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले.असलं तरी भातखळकर यांनी ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
भातखळकर हे वारंवार सोशल मीडियाद्वारे विरोधकांवर हल्लाबोल करताना दिसून येतात. नुकतंच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये नव्या वर्षाचे एक कॅलेंडर दिसत असून त्यावर मस्जिदीचा फोटो देखील दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोसह कॅलेंडरवर बाळासाहेब ठाकरेंपासून ते शिवसेनेच्या इतर प्रमुख नेत्यांचे फोटो देखील दिसत आहेत. “जनाब सेना पूर्ण हिरवी झाली आहे…लाचार सैनिक पूर्वी मुजरे घालायचे… आता कुर्निसात करतात म्हणे…” असं कॅप्शन देखील यावेळी भातखळकर यांनी त्या फोटोला दिले आहे.
जनाब सेना पूर्ण हिरवी झाली आहे…
लाचार सैनिक पूर्वी मुजरे घालायचे… आता कुर्निसात करतात म्हणे… pic.twitter.com/DnXkCsAci3— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 13, 2023
भातखळकर यांनी सेनेवर अशा शब्दात टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही देखील भातखळकर यांनी विरोधकांवर कडक शब्दात टीका केली आहे. याआधी भातखळकर यांनी बेरोजगारीमुळे तरुणांना मुली मिळत नाहीत या शरद अपवर यांच्या विधानावर देखील टीका केली होती. यावेळी भातखळकर यांनी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला होता.