अंटार्टिकातुन पोहोचला थेट न्यूझीलंडमध्ये वेलींग्टन संपुर्ण बर्फाळ प्रदेशाने व्यापून गेलेले अंटाक्र्टिका हेच पेंग्विन्सचे निवासस्थान मानले जाते पण सध्या प्राणी शास्त्रज्ञांना हैराण करणारी एक गोष्ट समोर आली आहे अंटार्क्टिकातुन प्रवास करून तब्बल 3000 किलोमीटरचे अंतर पार करून एक पेंग्विन थेट न्यूझीलंडमध्ये पोहोचला आहे
न्यूझीलंडच्या दक्षिण पूर्व किनारपट्टीवर हा पेंग्विन आढळला असून संपूर्ण बर्फाळ प्रदेशातील समुद्रातून पोहत पोहत हा पेंग्विन न्यूझीलंडमध्ये आला असावा असा अंदाज आहे आत्तापर्यंत अशी घटना फक्त तिसऱ्यांदा घडली आहे तीनही वेळेला पेंग्विन एवढे मोठे अंतर पार करून न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे
न्यूझीलंडच्या साउथ आयलंडमधील बर्डलिंक फ्लॅट नावाच्या एका वस्तीमध्ये हा पेंग्विन आढळला असून स्थानिक लोकांनी त्याला पिनू असे नाव दिले आहे या वस्तीत राहणारे स्थानिक नागरी हरिसिंग संध्याकाळी फिरण्यासाठी समुद्रकिनारी गेले
असताना त्यांना हा पेंग्विन तेथे आढळला यापूर्वी 1963 1993मध्ये अशाच प्रकारे पेंग्विन न्यूझीलंडच्या समुद्रकिनारी आढळले होते अर्थातअंटार्क्टिका च्या तुलनेत न्यूझीलंडचे वातावरण कमी थंड असल्याने हा पेंग्विन या वातावरणात कसा काय टिकणार याबाबत आता संशोधकांना चिंता वाटत आहे त्याच्या खाण्यापिण्याची सोय करणे आणि त्याला थंड वातावरणात ठेवणे याचे आव्हान आता स्थानिक नागरिकांना स्वीकारावे लागणार आहे स्थानिक प्रशासन आणि न्यूझीलंड सरकारही याबाबत पुढाकार घेत आहे