जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या साडेचौदा हजारांहून अधिक
आज 567 रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
नगर करोना अपडेट
बरे झालेली रुग्ण संख्या: 14531
उपचार सुरू असलेले रूग्ण : 3228
आजपर्यंतचे मृत्यू :
260
एकूण रूग्ण संख्या :
18019
नगर, दि.25 (प्रतिनिधी) -जिल्ह्यात आज 567 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 14 हजार 531 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 80.64 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 426 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 228 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 52, अँटिजेन चाचणीत 259 आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 115 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 25, पाथर्डी 1, नगर ग्रामीण 1, श्रीरामपूर 5, पारनेर 9, राहुरी 1, जामखेड 1, मिलिटरी हॉस्पिटल 9, अशा रुग्णांचा समावेश आहे.अँटिजेन चाचणीत आज 259 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा 34, राहाता 33, पाथर्डी 6, श्रीरामपूर 20, कॅन्टोन्मेंट 7, नेवासे 6, श्रीगोंदा 40, पारनेर 05, अकोले 38, राहुरी 2, शेवगाव 18, कोपरगाव 24, जामखेड 22 आणि कर्जत 4, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 115 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 85, संगमनेर 2, राहाता 3, नगर ग्रामीण 8, श्रीरामपूर 2, कॅन्टोन्मेंट 7, श्रीगोंदा 1, पारनेर 1, राहुरी 2, शेवगाव 1, कोपरगाव 2, जामखेड 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 567 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 221, संगमनेर 47, राहाता 30, पाथर्डी 16, नगर ग्रामीण 26, श्रीरामपूर 16, कॅन्टोन्मेंट 23, नेवासे 4, श्रीगोंदा 31, पारनेर 39, अकोले 5, राहुरी 1, शेवगाव 1, कोपरगाव 55, जामखेड 36, कर्जत 9, मिलिटरी हॉस्पिटल 6 आणि इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.