मुंबई – जॉनी लीव्हरने मिमिक्री आणि कॉमेडीच्या अप्रतिम प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. आज त्याची गणना बॉलिवूडच्या टॉप कॉमेडीयनमध्ये केली जाते. सोशल मीडियावर जॉनी लीव्हरच्या लेक आणि लेकीचे प्रचंड फॉलोवर्स आहे. अशात आता अफलातून बापलेकाची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. जॉनी लिव्हर त्याच्या कॉमेडीमुळे नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असतात. त्यांचा मुलगा जेसी लिव्हरही आता मोठया पडद्यावर दिसणार आहे.
View this post on Instagram
अफलातून’ या मराठी चित्रपटातून जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हर एकत्र दिसणार आहे. जेसी लिव्हर सिनेविश्वात वडिलांच्या पाउलावर पाउल ठेवून पदार्पण करणार आहे. या चित्रपटात जॉनी लिव्हर नवाब साहबच्या भूमिके दिसणार आहे. तर जेसी लिव्हर नवाबचा मुलगा आफताबच्या भूमिकेत दिसणार आहे. बाप लेकाची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. या बाप लेकाच्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकाही उत्सुक आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवणार असेच दिसून येते.
जॉनी लिव्हर आणि जेसी लिव्हरसोबत सिद्धार्थ जाधव, श्वेता गुलाटी, तेजस्वीनी लोणारी, विजय भाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, विष्णू मेहरा, रेशम टीपणीस अशी कास्ट ‘अफलातून’ चित्रपटात दिसणार आहे.