जिची प्रतीक्षा होती अखेर ती हाती आलीच..! ग्लोबल टिचरच्या ट्रॉफीचं असं केलं डिसले गुरुजींनी स्वागत

मुंबई – युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर करण्यात आला होता. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले.

काही महिन्यांपूर्वी लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली होती. या पुरस्कारासाठी तब्बल 7 कोटी रुपयांचे मानधन रक्‍कम देण्यात आले.जगभरातील सुमारे 140 देशांतील 12 हजारांहुन अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची निवड करण्यात आली. मात्र तेव्हा कोविड महामारीमुळे हे सर्व ऑनलाईनच होत होतं. डिसले गुरुजींना ग्लोबल टिचर्स अवॉर्ड सोहळ्यालाही हजेरी लावता आली नाही. त्यामुळे, आता डिसले गुरुजींनी मिळवलेली ट्रॉफी त्यांना घरपोच आली आहे.

 

हीच ती जीची मी वाट पाहत होतो, असे कॅप्शन डिसले गुरुजींना या फोटोला दिले आहे. या फोटोत ते ट्रॉफीला कीस करताना दिसत आहेत.

दरम्यान, क्‍यू आर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचे नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले होते.

यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करिता वापरणार आहेत. त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रम शिलतेला चालना मिळणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.