ज्याच्यासाठी मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावल्या, ‘तोच’ गेला; लता करेंच्या पतीचं करोनाने निधन

पुणे – बारामती येथील ७२ वर्षीय धावपटू लता करे हे नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे.  वयाची पासष्टी ओलांडली तरी लता करे विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी व्हायच्या. मुळात पती भगवान करे यांच्यावरील उपचाराचे पैसे जमा करण्यासाठी लता करे शरीरातलं सगळं बळ एकवटून धावायच्या. मात्र करोनाने त्यांच्या पतीचं निधन झालं.

लता करे 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. त्यांनी पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. मात्र बारामतीमधील रुग्णालयात करोनाचे उपचार सुरु असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे पतीला वाचविण्यासाठीची करे यांची धाव आता कायमची थांबली आहे.

आता लता करे पुन्हा धावताना दिसणार नाहीत. त्यांच्यासाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचं कारणच आता उरलेलं नाही. लता करे यांचे पती भगवान यांचं बुधवारी (5 मे) कोरोनामुळे निधन झालं आहे. भगवान करे यांच्या निधनाचे वृत्त येताच महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. करोनाची लक्षण जाणवल्यावर भगवान करे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. तिथं त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

बारामती मॅरेथॉन स्पर्धेत सलग तीन वेळा प्रथम क्रमांक मिळविण्याचा विक्रम लता करे यांच्या नावावर आहे. बारामती मॅरेथॉन व्यतिरिक्त इतर स्पर्धेतही लता करे यांनी सहभाग नोंदविला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.