पेठ – येथून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांची खड्डे चुकविताना मोठी कसरत होत आहे. नवीन पुणे-नाशिक बायपास रस्ता झाल्याने जुन्या पुणे-नाशिक रस्त्याची “ना घरका, ना घटका’ अशी अवस्था झाली आहे.
सध्या या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे कोणाचेही लक्ष नाही. या खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी वाहनांच्या चालकांना त्रास होत आहे. अनेक दुचाकी वाहनचालकांना मणके, कंबर दुखीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. सध्या ट्रॅक्टर, ट्रक व इतर वाहनाची इथून प्रवास करताना मोठी अडचण होत आहे.
या रस्त्यावर पडलेले खड्डे तीन ते चार फूट लांबी-रुंदीचे आहेत आणि सुमारे अर्धा फूट खोलीचे आहेत. या रस्त्यावर खडीकरण होऊन डांबरीकरण होणे गरजेचे आहे.