पुणे – पोलीस ‘सुतावरून स्वर्ग कसे गाठतील’ हे सांगता येत नाही. नुकतेच एका व्यक्तीचे पाकीट पोलिसांना रस्त्यावर सापडले. ते परत कसे करायचे, असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यामध्ये शोध घेतला असता, त्या व्यक्तीचा फोटो सापडला. फोटोच्या पाठीमागे असलेल्या क्रमांक लिहला होता. त्यावर फोन करून पोलिसांनी त्या व्यक्तीला ते पाकीट परत दिले. त्याचा व्यक्तीचा आनंद गगनाला मावेना. त्या व्यक्तीने केवळ फोटोमागे लिहलेल्या क्रमांकावर पोलिसांनी हे पाकीट परत केले.
पोलीस उपनिरीक्षक सुर्यकांत सपताळे आणि हवालदार जगताप 29 जानेवारी रोजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पंचशील चौकात त्यांना रस्त्यावर पाकीट सापडले. त्यामध्ये रोख रक्कम, एटीएम आणि महत्त्वाची कागदपत्रे आणि पासपोर्ट साईजचे फोटो होता.
त्या फोटोच्या पाठीमागे मोबाईल क्रमांक लिहला होता. त्या क्रमांकावर पोलिसांनी फोन केला. समोरील व्यक्तीने पाकीट सापडले आहे का, अशी विचारणा केली. त्यास पोलिसांनी “हो’ असे उत्तर दिले. त्यावेळी त्या व्यक्तीचा आनंद गगनाला मावेना, त्याने लगेच पर्वती दर्शन चौकी येथे जावून ते पाकीट घेतले. आणि पोलिसांचे आभार मानले. ही बाब समजताच वरिठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदुलकर यांनी सपताळे आणि जगताप यांचे कौतुक केले.